हमीभावाने तूर खरेदिसाठी शासनाची मंजुरी नोंदणी करण्यास झाली सुरुवात / Tur hamibhav

हमीभावाने तूर खरेदिसाठी शासनाची मंजुरी  नोंदणी करण्यास झाली सुरुवात / Tur hamibhav

सोयाबीन प्रमाणे आता तूर खरेदीसाठी केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. ऑनलाइन नोंदणी सुरुवात झालेली आहे.. आणि त्याची मुदत 22 फेब्रुवारी पर्यंत दिलेली आहे..

तूर खरेदीला प्रत्यक्ष सुरुवात कधी होईल हे स्पष्ट नसले तरीही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तुरीची हमीभावने नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.तरी राज्यातील शेतकरी वर्गांनी तूर शासकीय खरेदीसाठी नोंदणी करून घ्यावी.Tur hamibhav

  •    काय मिळणार आहे तुरीला हमीभाव ?
  • केंद्र शासनाने 2024-25 साठी तुरीला 7550 रुपये हमीभाव जाहीर केलेला आहे.

परंतु नवीन तूर बाजारात विक्रीसाठी आल्यामुळे खुल्या बाजारात सरासरी 7100 रूपये बाजार भाव मिळत आहे. शेतकऱ्याचे चारशे ते पाचशे रुपये प्रतिक्विंटल मागे नुकसान होऊ लागल्याने सोयाबीन प्रमाणे तुरीच्या शासकीय खरेदीची मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत होती.Tur hamibhav

तर राज्यात तुरीचे शासकीय खरेदी ही नाफेड मार्फत करण्यात येणार आहे त्यासाठी जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग व विदर्भ मार्केटिंगचे 20 केंद्र आहेत परंतु खरेदी विक्री संघांना पत्र आलेले आहे. प्रत्यक्ष तूर खरेदीला लवकर सुरुवात होईल सांगण्यात आले आहे.

Leave a Comment