solar kusum yojna
तुम्हाला असा मेसेज आला का?
आता प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत सौर कृषी पंप करिता आपल्याला पहिले महा ऊर्जा कडून आपल्याला सेल्फ सर्वे आणि पेमेंट भरण्यासाठी एसएमएस येत होते.
परंतु त्यांनी आता त्यामध्ये बदल करून महावितरण आणि महाऊर्जा यांच्या संयुक्त विद्यमानाने तुम्हाला असा मेसेज येईल.
त्यानंतर तुम्हाला महावितरण बेनीफिशरी हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून
👇👇अप्लिकेशन इन्स्टॉल करण्यासाठी येथे क्लिक करा👇👇
https://kusumoffice.mahadiscom.in/app
त्या मध्ये तुम्ही तुम्ही अर्ज भरताना जो मोबाईल नंबर दिला होता तो नंबर टाकावा लागेल.त्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल. तो ओटीपी तिथे टाकून तुम्हाला लॉगिन करून घ्यावे लागेल आणि नंतर खाली दिल्याप्रमाणे डॅशबोर्ड दिसेल
त्यामध्ये एप्लीकेशन डिटेल वरती जाऊन तुम्हाला सेल्फ सर्वे करून घ्यावा लागेल.
solar kusum yojna
सेल्फ सर्वे करताना ते तुम्हाला सुरुवातीला विचारेल की तुमच्याकडे कोणते नेटवर्क उपलब्ध आहे.तुमच्या शेतात म्हणजे तिथे तुम्हाला पंप इन्स्टॉल करायचा आहे तेथे ज्या कंपनीचे नेटवर्क चांगले असेल त्या कंपनीचे सिलेक्शन करून घ्या.
त्यानंतर ते तुम्हाला विचारेल की तुम्ही या अगोदर तुम्ही मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना किंवा किंवा प्रधानमंत्री कुसुम घटक कृषी पंप योजना यापैकी तुम्ही या अगोदर या योजनेमधून तुम्ही पंप इन्स्टॉल केलेला आहे का.तुम्ही ते निवडून घ्या.
त्यानंतर तुम्हाला सिंचनाचा स्रोत तुमच्याकडे उपलब्ध आहे का ते विचारेल तेथे जाऊन तुम्ही तुम्ही ते निवडून घ्या.
त्यानंतर ते तुम्हाला विचारेल की तुम्ही तुमच्या शेतात वीज कनेक्शन उपलब्ध आहे का तुम्ही ते निवडून घ्या.
त्यानंतर तुम्हाला एक फोटो पाण्याचा स्रोत म्हणजे विहीर किंवा बोर आणि लाभार्थी याचा दोघांचा एकत्रित फोटो घ्यावा लागेल.
त्याच्यानंतर तुम्हाला फक्त पाण्याचा श्रोताचा एक फोटो घ्यावा लागेल.पाण्याचा स्रोत जो असेल त्याच्या शेजारी एक जमिनीचा फोटो घ्यावा लागेल.आणि शेवटी तुम्हाला तिथे एक डिजिटल साइन म्हणजे तुम्हाला तिथे एक तुमच्या हाताने एक साईन करून घ्यावी लागेल.
आणि शेवटी सबमिट करून घ्या.आणि त्यानंतर तुमचे नेट चालू आहे की नाही याची खात्री करून तुम्ही तो सर्वे अपलोड करून घ्या.
सेल्फ सर्वे केल्यानंतर तुम्हाला पेमेंटचा भरणा करावा लागेल.
पेमेंटचा भरणा हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ऑनलाइन बँकिंग, डेबिट कार्ड, यूपीआय,… या पर्यायांचा वापर करून करू शकता.
त्यानंतर तुम्हाला वेंडर सिलेक्शन हे ऑप्शन येईल.आणि ज्या कंपन्याचा कोटा उपलब्ध असेल त्या कंपनीची यादी तुम्हाला समोर दिसेल.आणि त्या असलेल्या पर्याय मधून तुम्हाला जी कंपनी सिलेक्शन करायचे आहे.
त्या कंपनीचा सिलेक्शन करण्यासाठी तुम्हाला त्या कंपनीच्या नावावरती क्लिक करावे लागेल त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल आणि तो ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर तुमची निवडलेली कंपनी ही सिलेक्ट होऊन जाईल आणि तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती एक एसएमएस येईल
त्यामध्ये तुम्हाला दिसेल की तुम्ही कोणती कंपनी सिलेक्ट केलेली आहे.