yanda cha pavsacha andaj/यंदा महाराष्ट्रात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेट ने दिला आहे
ह्यावर्षी महाराष्ट्रासह देशभरातील 23 राज्यांमध्ये दमदार पाऊस होणार आहे तसेच जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये देशात सरासरी पाऊस पडणार असल्याचा अंदाज स्कायमेट या हवामान संस्थेने वर्तविला आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीला अल निनोच्या प्रभाव राहणार आहे त्यामुळे पावसाचे प्रमाण हे कमी असू शकते मात्र नंतर पावसाचे प्रमाण सामान्य होणार आहे असा अंदाज स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतिन सिंह यांनी सांगितलेले आहे.
आपल्या देशातील 70 ते 80 टक्के जमिन जमीन ही येणाऱ्या पावसावरच अवलंबून आहे. जर येणारे पावसाळ्यात जर चांगला पाऊस जर झाला तर संबंधित सर्वच शेतीतील गोष्टीचे उत्पन्न वाढते.त्यामुळे आपली अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होते.आणि हवामान बदलामुळे यंदाचा मार्च महिना हा सर्वाधिक उष्ण तेचा महिना ठरला आहे.युरोपियन हवामान विषयक संस्थेने स्पष्ट केले आहे की मागील जून महिन्यापासून मार्चपर्यंत लगातार दहा महिने विक्रमी तापमान राहिलेले आहे आणि मार्चमध्ये सरासरी तापमान 1850 ते 1900 या दरम्यान च्या तुलनेत 168 अंशाने जास्त आहे.
yanda cha pavsacha andaj/यंदा महाराष्ट्रात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेट ने दिला आहे.
स्कायमेट या संस्थेच्या अंदाजानुसार, राजस्थान ,मध्यप्रदेश ,उत्तर प्रदेश गुजरात, पंजाब , हरियाणा, चंदीगड महाराष्ट्र ,दिल्ली ,हिमाचल प्रदेश ,जम्मू काश्मीर ,लडाख ,उत्तराखंड ,गोवा ,आंध्र प्रदेश ,तेलंगणा ,कर्नाटक, केरळ तामिळनाडू , नगर हवेली , दमण, दीव
या सर्वच ठिकाणी भरपूर पाऊस पडणार
*चार राज्यात कमी पाऊस*
ओडिसा ,झारखंड ,बिहार, पश्चिम बंगाल मध्ये जुलै ते ऑगस्ट दरम्यान कमी पाऊस पडणार आहे. मात्र त्यानंतर सामान्य प्रमाणात पाऊस होणे शक्यता वर्तवली आहे.