KADBA KUTTI / कडबा कुट्टी मशीन साठी अर्ज सुरू
कड़बा कुट्टि मशीन साठी अनुदान ?आणि अर्ज कसा आणि कुठे करायचा ?
तुम्हाला कडबा कुट्टी हे मशीन घेण्यासाठी महाडीबीटी ह्या पोर्टलवरून तुम्हाला पहिले स्वतःची नोंदणी करून घ्यावी लागेल
नोंदणी करण्यासाठी 👉 https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login
अर्जदाराचे नाव
वापरकर्त्याचे नाव (म्हणजे तेथे तुमचा आधार नंबर जरी टाकला तरी चालेल)
तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकून पासवर्ड पुन्हा टाका
त्यानंतर तुमचा ईमेल आयडी टाकून ईमेल आयडी व व्हेरिफाय करून घ्या
त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक टाकून मोबाईल वरून क्रमांक ओटीपी येईल तो ओटीपी तिथे टाकून मोबाईल नंबर व्हेरिफाय करून घ्या
त्यानंतर शेवटी तिथे तुम्हाला एक कॅप्चर टाकण्यासाठी येईल तो कॅप्चर टाकून नोंदणी करा येथे दाबा.आता तुमची नोंदणी ही यशस्वी झाली आहे.
नोंदणी झाल्यानंतर अर्जदार लॉगिन येथे क्लिक करा .
अर्जदार लॉगिन येथे क्लिक केल्यानंतर पहिले तुम्ही जो वापर करता तो तिथे टाकून घ्या त्यानंतर तुम्ही जो पासवर्ड सेट केला आहे तो पासवर्ड तिथे टाकून कॅप्चर टाकून घ्या .आता लॉगिन करा.
लॉगिन केल्यानंतर तुमचा वैयक्तिक तपशील म्हणजे तुमचा ईमेल आयडी व्हेरिफाय करा मोबाईल नंबर टाकून करा तुमच्याकडे जर दुसरा पर्यायी मोबाईल नंबर असेल तर तो ते टाकून घ्या तुमचं नाव आडनाव आणि वडिलांचे नाव टाकून घ्या पण तुम्हाला आत्महत्याग्रस्त वारस आहात का नाही करा किंवा असेल तर होय करा त्यानंतर ते विचारेल भारतीय आपण भारतीय संरक्षण दलाचे माजी सैनिक अथवा सध्या सेवेत कार्यरत आहात का.
तिथे असेल तर होय करा नसेल तर नाही करा आणि तुमचा जात वर्गवारी म्हणजे तुमचा जातीचा वर्ग ज्या वर्गात येते ते क्लिक करा आणि वैयक्तिक अपंगत्व तपशिलामध्ये तुम्हाला कोणती अपंगत्व आहे का असेल तर होय करा नसेल तर नाही करा.
आणि शेवटी तुमचा बँक अकाउंट नंबर टाकून आयएफसी कोड टाका आणि तुमच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी मर्यादा आहे का हे होय किंवा नाही हे सिलेक्ट करा.शेवटी जतन करा येथे दाबा.
त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती जसे की तुमचा कायमचा पत्ता तुमचा कायमचा पत्ता टाकून घ्या त्यानंतर पत्र यावरचा आणि कायम स्वर पत्ता एकच आहे का? होय अशा होय करा नसेल तर तो तिथे टाका शेवटी जतन येथे क्लिक करा.
त्यानंतर जमिनीचा तपशिलामध्ये तुम्हाला तुमच्या शेत जमिनीची माहिती भरावी लागेल जसे की आपल्याकडे एकापेक्षा अधिक गावांमध्ये जमीन असेल तर तेथे माहिती भरा किंवा एकाच गावांमध्ये जर जमीन असेल तर नाही करा आणि ज्या गावांमध्ये आहे त्या गावामधील शेत जमिनीचा पूर्ण तपशील भरून घ्या.त्या जमिनीचा तपशील जतन करात्यानंतर पिकाचा तपसीला मध्ये हंगाम पिकाचा प्रकार आणि पीक शेतामध्ये कोणते आहे ते निवडून पिकाचा समावेश करा येथे क्लिक करून सेव करून घ्या.
त्यानंतर तुमच्याकडे पाण्याचा स्रोत आहे त्याबद्दलची माहिती द्यावी लागेल जसे की तुमच्याकडे कुंपणलिका असेल तर खूप पण नलिका निवडून तुमच्याकडे उद्या स्रोत काय आहे वीज कनेक्शन किंवा डिझेल पंप किंवा सौर ऊर्जातील पंप असेल ते निवडून घ्या आणि उपसा सिंचन जे असेल जसे की इंजिन, मोटर तु,षार सिंचन प्रणाली,पाईपलाईन, रेनगन, यापैकी जे असेल ते निवडून घ्या.
शेवटी जोडा येथे क्लिक करून जोडून घ्या
आता तुमची प्रोफाइल ही 100% पूर्ण झालेले आहे.
आता मुख्यपृष्ठ येथे येऊन
तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण ही बाब निवडून घ्यावे लागेल
त्यानंतर मुख्य घटक एक कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय आहे हे निवडून घ्या
त्यानंतर तपशिलामध्ये मनुष्यचलित अवजारे हे निवडून घ्या
त्यानंतर फॉरेज /ग्रास अँड स्ट्रा/ रेसिड्यू मॅनेजमेंट / (कटर / ट्रेडर) हे निवडून घ्या
मशीनचा प्रकार म्हणजे चाफ कटर हे तुम्हाला तीन एचपी पर्यंत घ्यायचा असेल तर तीन एचपी निवडा तीन एचपी पेक्षा मोठे जर घ्यायचा असेल तर( upto3)हे निवडा
शेवटी दिलेल्या अटींना सहमती देऊन जतन करा येथे क्लिक करा
आता हा तुमचा कडबा कुट्टी मशीन साठी तुमचा अर्ज झालेला आहे
आता पुन्हा मुख्यपृष्ठावर येऊन अर्ज करा येथे क्लिक करा
त्यानंतर अर्ज केलेली बाबीला प्राधान्य क्रमांक देऊन जतन करून घ्या आणि तुम्हाला पेमेंट तेवीस रुपये 60 पैसे हे पेमेंट करून घ्या
आता हा तुमचा पूर्णपणे अर्ज हा झालेला आहे.