Govt approves IFFCO’s 16% fertilizer/या नव्या संशोधनामुळे पिकाला होणार जास्त फायदा
इफकोचे 16% नत्र असलेल्या खताला शासनाची मान्यता.
🌱🌱केंद्र शासनाने राजपत्र प्रसिद्ध करत शिक्कामोर्तब केले.🌱🌱
या नव्या संशोधनामुळे सर्वच पिकांना होणार आहे अधिक फायदा.जागतिक रासायनिक खत उत्पादन मध्ये अग्रेसर असलेल्या इंडियन फार्मर्स फर्टीलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड ( इफको) या संस्थेने न्यानो तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वात अगोदर नॅनो युरियाची निर्मिती केली.यामध्ये महत्त्वाचे म्हणजे नॅनो युरियामध्ये नत्राचे प्रमाण हे 4 टक्के होते.त्याला भरघोस शेतकऱ्याकडून प्रतिसाद मिळाल्यानंतर इफको या संस्थेने आणखी संशोधन करून आताचे प्रमाण 16% वर नेण्यात आले.केंद्राने त्यावर शिक्कामोर्तब केल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनामध्ये अधिक फायदा होणार आहे.
नॅनो युरिया या सर्व खताच्या देशामध्ये विविध पिकावर चाचण्या घेण्यात आल्या आहेत 16 टक्के नत्राबाबत मंगळवारी (दि.16) केंद्र शासनाने शासकीय राजपत्र प्रसिद्ध करत खत नियंत्रण आदेशामध्ये या खताचा समावेश केला.
Govt approves IFFCO’s 16% fertilizer/या नव्या संशोधनामुळे पिकाला होणार जास्त फायदा
नॅनो एरियामध्ये 30 ते 50 नॅनोमीटर आकाराचे सूक्ष्म नत्र कणाचे द्रावण असते.त्याची कार्यक्षमता 90 टक्के आहे ते हाताळण्याला सोपे की पैसे आणि पिकाच्या उत्पादनामध्ये आणि गुणवत्तेमध्ये भरी वाढ करत असल्याची माहिती इफकोचे महाराष्ट्राचे विभागीय व्यवस्थापक उदय तिजोरी यांनी माहिती दिली.
खत नियंत्रण आदेशामध्ये 16% नत्र असलेल्या युरिया चा समावेश केल्यामुळे देशातील शेतकऱ्यांना अत्याधुनिक नॅनो युरिया खते फवारणी द्वारे उपलब्ध होऊन त्याच्या वापरातून अधिक फायदा शेतकऱ्यांना अपेक्षित आहे येणाऱ्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे.