SOYABIN/ KAPUS ANUDAN
राज्यामध्ये सन २०२३-२४ खरीप सोयाबीन व कापूस या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने हेक्टरी 5000 रुपये अनुदान हे 2 हेक्टर च्या मर्यादेमध्ये दिले होते परंतु काही शेतकऱ्यांना KYC करूनही त्यांचे अनुदान जमा झाले नव्हते . त्या शेतकऱ्यांना आता 16 जानेवारीपासून अनुदान मिळण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्हाला तुमचे अनुदान मिळाले आहे की नाही तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुमचे स्टेटस चेक करू शकता. आणि अद्यापही तुमची KYC झाली नसेल तर तिथे त्याच लिंक वर जाऊन तुमचा आधार नंबर टाकून ओटीपी based केवायसी करू शकता किंवा जवळच्या csc सेंटरवर जाऊन तिथे तुम्ही तुमची राहिलेली KYC करून घेऊ शकता.SOYABIN/ KAPUS ANUDAN
सर्वप्रथम लिंक ला क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे डॅशबोर्ड दिसेल. https://scagridbt.mahait.org/
Step 1. प्रथम आपण दिलेल्या लिंक वर भेट द्या
Step 2. Disbursement status वरती क्लिक करावे.
Step 3 . पुढे आपला आधार क्रमांक आणि कॅप्चर टाकून ओटीपी वर टिक करावे आणि गेट otp वरती क्लिक करावे.(परंतु आधार सी मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे)
Step 4. त्यानंतर आपल्या आधार नोंदणीकृत मोबाईल नंबर वरती ओटीपी पाठवला जाईल तू टाकून गेट डाटा यावर क्लिक करा.
Step 5. त्यानंतर आपण ओटीपी टाकल्यानंतर तो ओटीपी जुळल्यास आपल्याला आपले अनुदान रक्कम जमा कोणत्या बँक खात्यामध्ये झाले आहे ते दिसेल आणि जमा केलेल्या दिनांक याची माहिती दर्शवली जाईल.