PM KISAN & NAMO SHETKARI Pm Kisan आणि Namo Shetkari : केंद्र सरकारने 2018 पासून पंतप्रधानकिसान सन्मान योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000/- वार्षिक मिळतात म्हणजे प्रत्येक चार महिन्याला 2000/-डीबीटी द्वारे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातात. आतापर्यंत शासनाने या योजनेचे 18 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना आता पुढील हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. PM KISAN & NAMO SHETKARIari : केंद्र सरकारने 2018 पासून पंतप्रधान
पीएम किसन योजनेतून बोगस लाभार्थी वगळण्यासाठी शासनाने KYC करणे बंधनकारक केले आहे ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसन योजनेची केवायसी केली नाही अशा शेतकऱ्यांचे पुढील हप्ते बंद होणार आहे पी एम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेचा लाभ मिळण्यासाठी केवायसी करणे अनिवार्य आहे आणि बँक खात्याला आधार लिंक करणे पण अनिवार्य आहे.
पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता 25 जानेवारी नंतर शेतकऱ्यांना मिळणार आहे. पात्र शेतकऱ्याची माहिती शासनाने 19 जानेवारी पर्यंत मागण्यात आली होती. पी एम किसान योजनेचा हप्ता मिळाल्यानंतर फेब्रुवारी राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासंघ निधी योजनेचा हप्ता मिळणार आहे असे कृषी विभागाकडून सांगण्यात आलेले आहे
. अद्याप पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता पूर्वीप्रमाणे देण्यात येणार आहे. परंतु यापुढे पीएम किसन योजनेत काही बदल होणार आहे. जसे की कुटुंबातील एकालाच लाभ.. म्हणजे एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे योजना लाभ घेता येणार आहे यापुढे अर्ज करताना पती-पत्नी आणि मुले यांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आलेले आहे..