लाडकी बहीण योजनेच्या सातव्या हप्त्याची तारीख जाहीर…LADKI BAHIN YOJNA
महाराष्ट्र शासनाने जुलै 2024 मध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेमधून महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये इतकी रक्कम मिळत आहे . आतापर्यंत सहा हप्ते महिलांना मिळाले आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 60 इतकी देण्यात आली आहे योजनेचा आता शासनाने लाभ घेण्यासाठी काही अटी व शर्तीचे निकष लावले आहेत येणारा सातवा हप्ता हा कधी मिळणार आहे याबद्दल आदिती तटकरे यांनी तारीख जाहीर केली आहे ती म्हणजे 20 जानेवारी ते 26 जानेवारी पर्यंत सर्व लाडकी बहीण योजनेमधील महिलांना हे सातवा हप्ता मिळणार आहे.
लाडकी बहिण योजनेत 2100 रुपये कधीपासून मिळणार यावर देखील मंत्री आदिती तटकरे प्रतिक्रिया दिली आहे. आधीसुद्धा याबाबत बऱ्याच वेळा स्पष्टीकरण दिले आहे. येत्या अर्थसंकल्पात व त्यापुढील काळात योजनेची रक्कम वाढवण्याचा विचार करण्यात येणारं आहे. या महिन्यात 1500 रुपयांचा लाभ दिला जाईल त्यासाठी 3 हजार 690 कोटींची तरतूद करण्यात आली असून तो लवकरच देण्यात येणारं आहे असेही तटकरे यांनी म्हटले आहे.