FARMER ID CARD ; आता शासनाने आपल्या सातबाराला आधार नंबर लिंक व्हावा यासाठी अग्रीस्टॅक (agristack) च्या मदतीने आता सर्व सातबारांना त्यांना एक युनिक नंबर म्हणजे युनिक कार्ड मिळणार आहे.
शेतकरी विशिष्ट ओळखपत्र
आता शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र बनवणे आवश्यक राहणार आहे.
आता शेतकऱ्यांच्या तिची फार्मर आयडी ओळखपत्र तयार केले जाणार आहे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजे शेतीचे आधार कार्ड होय. FARMER ID CARD
शेतकरी विशिष्ट ओळखपत्र याचा वापर कशासाठी होणार
1) एकाच पर्यायामध्ये अनेक सरकारी योजनेचा लाभ मिळवता येणार
२) डिजिटल पद्धतीने पिकाचे मर्यादानुसार KCC कर्ज मिळवता येणार आहे.
३) महाडीबीटी या पोर्टल वरील श्री संबंधित सर्व योजनेचा लाभ मिळवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे
४) आपल्या शेतातील मृदा आरोग्य बद्दल योग्य माहिती समजून घेता येणार
५) हवामानाच्या आधारे पिकावरील रोगाचा प्रभाव अंदाज घेता येणार.
यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहे.
१) सर्वात पहिले म्हणजे आपले आधार कार्ड
२) आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक असावा ( आधार संलग्न ) मोबाईल
३) आपल्या शेतीचा सर्वे नंबर माहित असणे आवश्यक आहे(गट क्रमांक)
आणि पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता मिळण्यासाठी शेतकरी विशिष्ट ओळखपत्र असणे आवश्यक असणार आहे…