All government documents mother name is compulsory /आता सर्व सरकारी दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक
All government documents mother name is compulsory/आता सर्व सरकारी दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक
शासकीय दस्तऐवजामध्ये आईच्या नावाचा समावेश आता वेगवेगळ्या स्तंभामध्ये न दर्शवता.
अगोदर उमेदवाराचे नाव
⬇️
त्यानंतर आईचे नाव
⬇️
वडिलांचे नाव आणि आडनाव
अशा स्वरूपामध्ये नोंदविण्याचे बंधनकारक करण्याचा मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेण्यात आला आहे.
1 मे 2024 रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकाच्या नावाची नोंद बालकाचे नाव त्यानंतर आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनावाच्या स्वरूपात सर्व शैक्षणिक कागदपत्रे वेतनशक्ती सेवा पुस्तक महसुली दस्तावेज विविध परीक्षांच्या अर्जाच्या नमुन्यामध्ये इत्यादी शासकीय दस्तऐवजामध्ये बंधनकारक करण्यास मान्यता मिळालेली आहे
विवाहित स्त्रीच्या बाबतीत काय आहे जीआर मध्ये ?
विवाहित स्त्रीच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या …
विवाहनंतर चे म्हणजे तिचे नाव
⬇️
नंतर तिच्या पतीचे नाव
⬇️
व शेवटी आडनाव
अशा स्वरूपात नाव नोंदणी प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे.
स्त्रीला लग्ना पूर्वीच्या नावाने असलेले संपत्ती किंवा मालमत्ता कागदपत्रांमध्ये (दस्तऐवजा मध्ये) नोंदविण्याची मुभा देण्याची मान्यता मिळालेली आहे.
या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात आलेले आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित दादा पवार यांनी या निर्णयाची अंमलबजावणी स्वतःपासून सुरू केलेली आहे या निर्णयामुळे समाजातील सर्वच महिलांच्या प्रतिष्ठेमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे.
या जीआर ची अंमलबजावणी आपल्या राज्याच्या म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या शुभ अवसरापासून होत आहे.
solar panels on a mobile home solar panels on a mobile home .
plumbing services san jose https://plumbersan-joseca4.com .